MPSC चे सुधारीत वेळापत्रक जारी; अशा आहेत तीन परीक्षांच्या तारखा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 01:36 PM2021-01-11T13:36:22+5:302021-01-11T13:39:01+5:30
MPSC Exam: परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासनाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर, २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. या परिक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय दिनांक ७ सप्टेंबर, ० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर, २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. तथापि, सदर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासनाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर, २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. या परिक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर, २०२० रोजी नियोजित सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर, २०२० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा पुढे नण्याबाबत दिनांक १३ ऑक्टोबर, २०२० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले. २. सन २०२० मधील आयोजित उपरोक्त ३ परीक्षा पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर
खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास नियोजित करण्यात येत आहेत :
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.