श्री.ना. पेंडसे यांची आज पुण्यतिथी

By admin | Published: March 24, 2016 10:16 AM2016-03-24T10:16:02+5:302016-03-24T10:28:33+5:30

‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ अशा यशाच्या शिखऱ गाठणा-या कादंब-यांचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांची आज पुण्यतिथी आहे

Mr. N. Today Pendse's death anniversary | श्री.ना. पेंडसे यांची आज पुण्यतिथी

श्री.ना. पेंडसे यांची आज पुण्यतिथी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २४ - ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ अशा यशाच्या शिखऱ गाठणा-या कादंब-यांचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांची आज पुण्यतिथी आहे. पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचेच. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
 
१९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९४१ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘खडकावरील हिरवळ’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यावर आधारलेली ‘एल्गार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘हद्दपार’ ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. १९६२ साली लिहिलेल्या ‘रथचक्र’ या कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबर्यां‘मधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येत असे. 
 
श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. ‘गारंबीच्या बापू’ ची मोहिनी अनेक पिढय़ा टिकली. नव्हे, आजही टिकून आहे. श्री. ना. पेंडसे यांनी आपल्या कादंबरीचं केलेलं नाटय़रूपांतरही तितकंच प्रभावी आहे. 
 
‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ ला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ‘ऑक्टोपस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते. त्यानंतरची श्री. ना. यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’ चार पिढ्यांच्या कहाणीची ही कादंबरी चौदाशे पानांची दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते.‘गारंबीचा बापू’, ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. ‘जुम्मन’ नावाचा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. श्री. ना. पेंडसे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. मा. श्री. ना. पेंडसे २४ मार्च २००७ रोजी निधन झाले. लोकमत समूहातर्फे  मा. श्री. ना. पेंडसे यांना आदरांजली. 
 

Web Title: Mr. N. Today Pendse's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.