मार्इंच्या जाण्याने श्री सदस्य झाले पोरके
By admin | Published: April 16, 2015 02:06 AM2015-04-16T02:06:33+5:302015-04-16T02:06:33+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता.
अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने लाखो श्री सदस्यांचे मायेचे छत्र हरपले. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब, उमेश, सचिन, राहुल हे तीन चिरंजीव व प्रीती ही कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अनितातार्इंच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे साठ हजारांपेक्षा अधिक श्री सदस्य बुधवारी सकाळीच रेवदंड्यात पोहोचले.चौलपासून रेवदंड्यापर्यंत श्री सदस्यांनी रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत शिस्तीत उभे राहून वाहनांना दिशादर्शक मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
अनिताताई यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पंडितशेठ पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, रायगड जि.प.अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक प्रताप गंभीर, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, रायगड पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.
अल्प परिचय
च्अनितातार्इंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या गावात मध्यमवर्गीय खंडकर कुटुंबात २२ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. नलिनी असे त्यांचे माहेरचे नाव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंडणगड येथेच झाले. रेवदंड्यामधील निरुपणाची अनन्यसाधारण परंपरा जोपासलेल्या आणि त्याच माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबातील दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब यांच्याशी त्यांचा मार्च १९७४ मध्ये विवाह झाला.
श्री सदस्यांचा मायेचा आधारस्तंभ हरपला
धर्माधिकारी परिवाराकडून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या कार्यात मार्इंची भूमिका मोठी होती. त्यांच्या निधनाने श्री सदस्यांचा एक मायेचा आधारस्तंभ हरपला आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
त्यांचे कार्य सुरू
ठेवणे हीच श्रद्धांजली
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून समाजपरिवर्तनाचा वारसा आप्पासाहेब यांनी प्रभावीपणे सुरू ठेवला. त्यामध्ये त्यांना लाभलेली अनितातार्इंची साथ ही महत्त्वपूर्ण होती. त्यांचे कार्य पुढे अथक सुरू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
-प्रकाश महेता,
पालकमंत्री, रायगड
आप्पासाहेबांच्या
त्या प्रेरणा होत्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे समाज प्रबोधनाचे कार्य त्यांच्या पश्चात आप्पासाहेबांनी अविरतपणे सुरुच ठेवले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी अनिताताईंचा सिंहाचा वाटा आहे. आप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या. धर्माधिकारी कुटुंबीय आणि त्यांच्या श्री सदस्यांना मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर धर्माधिकारी कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस
अनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड : अनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड होत्या. नानासाहेब, शारदामाता गेल्यानंतर या कुटुंबासह श्री सदस्यांना सावरण्याचे काम त्यांनी केले. आप्पासाहेबांच्या कार्यामागे त्या सक्षमपणे उभ्या होत्या. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे. - प्रशांत ठाकूर, आमदार