एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाचे रूपडे पालटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:14 AM2018-03-06T06:14:07+5:302018-03-06T06:14:07+5:30
संगणकाचे प्राथमिक शिक्षण मानल्या जाणाºया एमएस-सीआयटी या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल केल्याची घोषणा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कंपनीने सोमवारी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील बदलत्या गोष्टींचा समावेश करून अॅप्लिकेशनमध्ये मूलभूत बदल करत, एमएस-सीआयटी नव्या रुपात समोर आणल्याचे कंपनीने या वेळी स्पष्ट केले.
मुंबई - संगणकाचे प्राथमिक शिक्षण मानल्या जाणाºया एमएस-सीआयटी या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल केल्याची घोषणा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कंपनीने सोमवारी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील बदलत्या गोष्टींचा समावेश करून अॅप्लिकेशनमध्ये मूलभूत बदल करत, एमएस-सीआयटी नव्या रुपात समोर आणल्याचे कंपनीने या वेळी स्पष्ट केले.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या एमएस-सीआयटीमध्ये संगणकातील नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खºया अर्थाने प्रशिक्षणार्थींना आयटी साक्षर होता येईल. पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये नव्या स्किल्सचा समावेश केला आहे. त्यात ‘तुम्ही बोलत राहा आणि संगणक टाईप करेल’, अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा?, अॅनिमेशन आणि गेमसाठी आवश्यक सोपी व्हिज्युअल प्रोग्रॅमिंग टूल्स, आॅनलाइन अॅप्लिकेशन्स भरण्याची योग्य पद्धत, आॅनलाइन प्रक्रियेतून आधार कार्ड किंवा जन्मप्रमाणपत्र कसे काढायचे व त्यासाठी आॅनलाइन प्रक्रिया कशी पूर्ण करायची, गुगल मॅप सर्चिंग अशा सर्वच बाबींचा नव्या प्रशिक्षणात समावेश आहे. यासह दैनंदिन जीवनातील मोबाइल अॅप्लिकेशन्स व विविध संकेतस्थळांचीही माहिती या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.
या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये ‘चर्चात्मक वास्तव’ या घटकाचा समावेश केला आहे. त्यात माहितीपर व्हिडीओचाही समावेश आहे. याशिवाय, इंग्रजी संभाषण कौशल्याचा समावेशही करण्यात आला आहे.