लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 03:31 PM2020-09-30T15:31:02+5:302020-09-30T19:29:43+5:30

लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना  नवीन वीज जोडणी देण्यात आली.

MSEDCL connects 71,000 customers in Vidarbha with new electricity during lockdown | लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

Next
ठळक मुद्देराज्यात २ लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे.अकोला  परिमंडळात १३ हजार ९३७ ग्राहकांना नवीन वीज जोडणी.

अकोला: कोरोनामुळे लॉक डाउन झाल्यामुळे सर्वच व्यवहार बंद असतानाच्या कठिण काळातही महावितरणने मात्र ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देताना सुमारे २ लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे.या काळात विदर्भात एकूण ७१ हजार ४२६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली त्यात अकोला परिमंडळातील १३ हजार ९३७ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉक डाउन लावण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला संचारबंदी  होती. याही काळात सर्व खबरदारी घेऊन जीवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत ठेवला. हे करत असतानाच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी पाहिजे होती, अशा ग्राहकांना तातडीने यंत्रणा उभारून वीज जोडणी दिली.

राज्यात १ एप्रिल २०२० ते २९ सप्टेंबर २०२० या काळात विविध योजनेतून २ लाख २२ हजार १७१ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली.  यामध्ये विदर्भात अमरावती परिमंडळासह नागपुर ,अकोला,चंद्रपुर आणि गोंदिया अशा पाच परिमंडळाचा समावेश आहे.त्यापैकी अकोला  परिमंडळात १३ हजार ९३७ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली. अमरावती परिमंडलात-१४८११,  नागपुर-२२५३६,   चंद्रपूर-१०,२७०,गोंदिया-९,८७२ ग्राहकांना असे विदर्भातील ७१ हजार ४२६ ग्राहकांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहे.तर उर्वरित महाराष्ट्रात १ लाख ५० हजार ७४५ ग्राहकांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने  औरंगाबाद परिमंडळात -१४,३९०,  बारामती -२४,५३७, भांडुप-१८,२५९,,जळगांव-१६,६२१, कल्याण ३१,२०५,कोकण-७,५१०,कोल्हापूर-२०,२०२, लातूर-१५,६६२ आणि नांदेड परिमंडलात २ हजार ३६९ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ग्राहकांची सोय म्हणून महावितरणकडून नवीन वीज जोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. 

Web Title: MSEDCL connects 71,000 customers in Vidarbha with new electricity during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.