महावितरणने ७५२१ तक्रारीचे केले जागेवरच केले निरसन

By appasaheb.dilip.patil | Published: July 31, 2017 01:23 PM2017-07-31T13:23:02+5:302017-07-31T13:23:39+5:30

सोलापूर दि ३१ :ग्राहक संपर्क अभियानात प्राप्त झालेल्या ८९७८ पैकी ७५२१ अर्ज व तक्रारींचे जागेवरच निरसन करून वीजग्राहकांचे समाधान करण्यात आले.

MSEDCL has filed 7521 grievances against the applicants | महावितरणने ७५२१ तक्रारीचे केले जागेवरच केले निरसन

महावितरणने ७५२१ तक्रारीचे केले जागेवरच केले निरसन

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३१ : पश्चिम महाराष्ट्रात महावितरणने ग्राहक संपर्क व संवाद वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या ग्राहक संपर्क अभियानात प्राप्त झालेल्या ८९७८ पैकी ७५२१ अर्ज व तक्रारींचे जागेवरच निरसन करून वीजग्राहकांचे समाधान करण्यात आले. तर प्रलंबित राहिलेल्या १४६७ तक्रारींचे ठराविक मुदतीत निराकरण करून त्याची माहिती संबंधीत वीजग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राज्याचे ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यभरातील दौºयात नागरिकांशी थेट संवाद उपक्रम सुरु होता़ त्याच धर्तीवर महावितरणला ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले होते़ त्यानुसार महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ११ ते १९ जुलैपर्यंत ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महावितरणच्या अधिकाºयांनी प्रत्येक शहर व तालुकास्तरावर अभियान राबवून ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़
अभियानाच्या कामगिरीवर एक नजऱ़़
या अभियानात पुणे जिल्ह्यात ५७०७ पैकी ५०५४ अर्ज व तक्रारींवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात ८६४ पैकी ५५६, सांगली जिल्ह्यात ८२५ पैकी ६४१, सोलापूर जिल्ह्यात ५४३ पैकी ३०३ व सातारा जिल्ह्यात १०३९ पैकी ९६७ अर्ज व तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. या अभियानात प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता एम.जी. शिंदे (पुणे), नागनाथ इरवाडकर (बारामती) व किशोर परदेशी (कोल्हापूर) यांनीही सहभागी होऊन वीजग्राहकांशी संवाद साधला व ग्राहकसेवेसंदर्भात अपेक्षा जाणून घेतल्या. यासोबतच इतर अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनीही तालुका व उपविभागनिहाय अभियानाचे आयोजन करून वीजग्राहकांचे अर्ज व तक्रारी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. हे अभियान आता नियमित स्वरुपात राबविण्यात येणार असून त्यासंबंधी लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार आहे.
इन्फो बॉक्स़़़़़़़
या तक्रारींचे झाले निरसन
वीजग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी, नावात बदल, पत्त्यात बदल, वीजभार आदींसाठी अर्ज मंजुरी तसेच सदोष किंवा चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारी सोडविण्यात आल्या़ नवीन वीजजोडणी व इतर अर्जाच्या मंजुरीची व विजसेवेविषयक तक्रारी निरसनची प्रक्रिया जागेवरच करण्यात आली़ या अभियानास वीजग्राहकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला.

Web Title: MSEDCL has filed 7521 grievances against the applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.