महावितरणला थकबाकीचा शॉक; पुरवठा खंडित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:13 AM2018-03-23T00:13:19+5:302018-03-23T00:13:19+5:30
सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याने महावितरणला थकबाकीचा चांगलाच शॉक बसला असून, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे.
मुंबई : सर्व प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची वीज बिले थकीत असल्याने महावितरणला थकबाकीचा चांगलाच शॉक बसला असून, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणकडून राज्यात राबविण्यात येत आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या सुमारे १ कोटी ४१ लाख ग्राहकांकडे जानेवारी २०१८ अखेरीस एकूण थकबाकी ३९ हजार कोटी आहे. या थकबाकीत ५७ लाख ५६ हजार घरगुती ग्राहकांकडे सुमारे १ हजार ५०० कोटी, ५ लाख ७३ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडे सुमारे ४७८ कोटी, १ लाख ५ हजार उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे ८४७ कोटी, ४१ हजार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १ हजार ५०० कोटी, ७९ हजार पथदिवे ग्राहकांकडे सुमारे ३ हजार ३०० कोटी, ३८ लाख कृषी ग्राहकांकडे सुमारे २३ हजार कोटी, ५७ हजार इतर ग्राहकांकडे सुमारे ७९ कोटी रुपयांचा समावेश आहे. राज्यात ३ लाख ५७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदार ग्राहकांकडे ७ हजार कोटींची थकबाकी आहे. महावितरणने थकबाकी वसुलीसाठी थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.
थकीत अंदाजित रक्कम
१ कोटी ४१ लाख : एकूण थकबाकीदार ग्राहक
३९ हजार कोटी : जानेवारी २०१८ अखेरीस एकूण थकबाकी
१,५०० कोटी : ५७ लाख ५६ हजार घरगुती ग्राहकांकडील थकीत रक्कम
४७८ कोटी १ लाख ५ हजार : ५ लाख ७३ हजार वाणिज्यिक ग्राहकांकडील थकीत रक्कम
८४७ कोटी : उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडील थकीत रक्कम
१,५०० कोटी : ४१ हजार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडील थकीत रक्कम
३,३०० कोटी : ७९ हजार पथदिवे ग्राहकांनी थकविलेली रक्कम
२३ हजार कोटी : ३८ लाख कृषी ग्राहकांकडील थकीत रक्कम
९३८ कोटी : ४५ हजार २१९ यंत्रमाग ग्राहकांकडील थकीत रक्कम
७९ कोटी : अन्य ५७ हजार ग्राहकांनी थकविलेली रक्कम