महावितरण, पारेषणला नाममात्र दराने जागा

By admin | Published: April 13, 2016 01:57 AM2016-04-13T01:57:24+5:302016-04-13T01:57:24+5:30

महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांना पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेली जमीन एक रुपया नाममात्र दराने ३० वर्षांच्या लीजवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने

MSEDCL, the place for transmission at a nominal rate | महावितरण, पारेषणला नाममात्र दराने जागा

महावितरण, पारेषणला नाममात्र दराने जागा

Next

मुंबई : महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांना पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेली जमीन एक रुपया नाममात्र दराने ३० वर्षांच्या लीजवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही माहिती दिली.
या निर्णयामुळे या कंपन्यांवरील आर्थिक भार तर कमी होईलच, पण विद्युत सुविधांचे जाळे निर्माण होईल आणि विजेचे दर स्थिर ठेवण्यास मदत होईल, असे बावनकुळे म्हणाले. महावितरण आणि महापारेषणकडून प्रस्ताव आल्यानंतर जिल्हाधिकारी एक महिन्याच्या आत जमीन देतील. त्यावर पायाभूत सुविधांची निर्मिती त्यानंतर तीन वर्षांच्या आत करण्याची अट असेल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: MSEDCL, the place for transmission at a nominal rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.