एमएसएन-हॅथवेच्या वादात ग्राहकांना त्रास
By admin | Published: August 27, 2015 02:18 AM2015-08-27T02:18:10+5:302015-08-27T02:18:10+5:30
एमएसएन आणि हॅथवे दरम्यानच्यावादामुळे मुंबई आणि देशभरातील अन्य शहारांत ‘एमएसएन’ चॅनल्सचे प्रक्षेपण थांबविण्यात आल्याने ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे
मुंबई: एमएसएन आणि हॅथवे दरम्यानच्यावादामुळे मुंबई आणि देशभरातील अन्य शहारांत ‘एमएसएन’ चॅनल्सचे प्रक्षेपण थांबविण्यात आल्याने ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. पैशांवरून सोनी चॅनल आणि हॅथवे दरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे मुंबईसह देशभरातील अनेक भागांतील ग्राहकांना सोनी आणि एमएसएनचे अन्य चॅनल पाहण्यास मिळत नाहीत.
हॅथवे आणि एमएसएन दरम्यानचा करार ३१ मार्च २०१५ रोजी संपला आहे. हॅथवेकडून मागच्या सात महिन्यापासून पैसे (१४ कोटीचे शुल्क) मिळाले नाही, असे एमएसनचे म्हणणे आहे; तर हॅथवेने असा दावा केला आहे की, एमएसएन अधिक शुल्क मागत आहे.
या वादावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा महाराष्ट्रातील केबल आॅपरटेर्सच्या संघटनेने व्यक्त केली आहे. एमएसएनचे म्हणणे आहे की, गेल्या सात महिन्यापासून हॅथवेकडून पैसे मिळालेले नाहीत. हॅथवेकडून काहीच प्रतिसाद न मिळालेल्याने हे प्रकरण सॅटकडे(लवाद) नेण्यात आले. आॅक्टोबरअखेर पैसे चुकते करण्यास हॅथवेला सांगण्यात आले आहे. तोवर एमएसएनने जुलैत हॅथवेला नोटीस जारी करीत ६ आॅगस्टपासून चॅनल्सचे प्रक्षेपण रोखले आहे.
आम्ही तोडगा काढण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले;परंतु, तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे एमएसएनच्या प्रवक्त्याने सांगितले. तर, एमएसएन वाढीव शुल्क मागितले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. नवीन करार करण्यासाठी एमएसएन जास्त पैसे मागत आहे. वाढीव शुल्क आम्हांला मान्य नाही, असे हॅथवेच्या प्रवक्त्याने सांगितले.
अनेक महिने वाट
वाट पाहूनही हॅथवेकडून प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही लवादाकडे धाव घेऊन हॅथवेला शुल्क अदा करण्यास सांगितले.तरीही पैैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आम्हाला चॅनल्सचे प्रक्षेपण थांबवावे लागले. १६ जुलै रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर २१ दिवसांनंतर ६ आॅगस्टपासून चॅनल्सचे प्रक्षेपण रोखण्यात आले, असे एमएसएन कंपनीचे मार्केटिंग प्रमुख मकरंद पालेकर यांनी सांगितले.