Mucormycosis: भय इथले संपत नाही! कोरोना पाठोपाठ राज्यावर आणखी एक संकट; टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:48 AM2021-05-21T10:48:32+5:302021-05-21T10:50:25+5:30
Mucormycosis: कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रावर आणखी एक संकट; आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार
मुंबई/नवी दिल्ली: राज्यात एप्रिलच्या मध्यापासून कठोर निर्बंध लागू असल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ३० हजारांच्या आत आला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होऊ शकते. मात्र आता राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. ब्लॅक फंगसमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोका
देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे जवळपास ५५०० रुग्ण आढळून आले. ब्लॅक फंगसमुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या लक्षात घेता, त्यापैकी ७० टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. ब्लॅक फंगसचा धोका वाढल्यानं ५ राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. ब्लॅक फंगसमुळे परिस्थिती बिघडत चालली असून या आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी औषधाची कमतरता भासू लागली आहे.
कोरोनाच्या संकटात मोठा निष्काळजीपणा! देशातील 50 टक्के लोक मास्कच वापरत नाहीत; रिसर्चमधून खुलासा
देशभरात ५५०० जणांना ब्लॅक फंगस आजार झाला आहे. यातील १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९० जण महाराष्ट्रातील आहेत. ब्लॅक फंगसमुळे हरयाणात १४, तर उत्तर प्रदेशात ८ जणांनी जीव गमावला आहे. उत्तर प्रदेशात ब्लॅक फंगसमुळे प्राण गमावणारे सर्व रुग्ण राजधानी लखनऊमधील आहेत. बिहारमध्ये ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसदेखील आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे.
कोणत्या राज्यात काय स्थिती?
झारखंडमध्ये ब्लॅक फंगसमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन जणांचा ब्लॅक फंगसमुळे जीव गेला आहे. बिहार, आसाम, ओदिशा आणि गोव्यात प्रत्येकी एक जण दगावला आहे. काही राज्यांनी अद्याप ब्लॅक फंगसशी संबंधित माहिती गोळा केलेली नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.