Mucormycosis : रुग्णांना मोठा दिलासा, म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:35 PM2021-06-04T16:35:38+5:302021-06-04T16:47:46+5:30
Mucormycosis : दरनिश्चिती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.
मुंबई : राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. दरनिश्चिती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. (Maharashtra govt caps cost of treatment for mucormycosis in private hospitals)
राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे असा प्रकारांना आळा बसणार आहे. खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून 31 जुलै 2021 पर्यंत राज्यभर लागू राहील.
दरम्यान, राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार, महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
पहिल्यांदाच 'आईच्या दूधाची' लॅबमध्ये निर्मिती, खुल्या बाजारात विकण्याची तयारी https://t.co/G548LC7jvr#MILK#breastfeeding
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021
वर्गवारीनुसार दरआकारणी होणार!
म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर पुढीलप्रमाणे....
वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा – अ वर्ग शहरांसाठी 4000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 3000 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.
आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ वर्ग शहरांसाठी 7500 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 5500 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 4500 रुपये
आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ वर्ग शहरांसाठी 9000 रुपये, ब वर्ग शहरांसाठी 6700 रुपये आणि क वर्ग शहरांसाठी 5400 रुपये
अ श्रेणी –
मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका)
पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी)
नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)
ब श्रेणी – नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली
क श्रेणी – अ आणि ब गट वगळता सर्व भाग
Maharashtra govt caps cost of treatment for mucormycosis in private hospitals
— ANI (@ANI) June 4, 2021
"Rate of treatment for this disease in urban & rural areas cannot be higher than fixed rate. If found that extra charges have been levied then excess amount shall be reimbursed to patient," reads order pic.twitter.com/ptzU7bPTZc
विशेष म्हणजे, म्युकरमायकोसीस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने 28 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 1 लाख रुपयांपासून ते 10 हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी 75 हजार रुपयांपासून ते 7500 रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी 60 हजार रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.