मुकेश अंबानींनी वॉरेन बफेंना टाकलं मागे; जगातील अब्जाधीशांच्या यादीत 'एक पाऊल पुढे'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 08:28 PM2020-07-10T20:28:04+5:302020-07-10T20:30:15+5:30

मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 मार्चला आरआयएलच्या प्रति इक्विटी शेअर्सची किंमत बीएसईवर 864 रुपए एवढी होती. मात्र आता ती वाढून 1,820 रुपयांवर पोहोचली आहे.

Mukesh Ambani Now Richer Than Warren Buffett with $68.3 billion  | मुकेश अंबानींनी वॉरेन बफेंना टाकलं मागे; जगातील अब्जाधीशांच्या यादीत 'एक पाऊल पुढे'

मुकेश अंबानींनी वॉरेन बफेंना टाकलं मागे; जगातील अब्जाधीशांच्या यादीत 'एक पाऊल पुढे'

Next
ठळक मुद्देवॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती 67.9 अब्ज डॉलर एवढी आहे. तर अंबानी यांची एकूण संपत्ती 68.3 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.जागातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी 8 व्या क्रमांकावर आले आहेत. तर बफेट 9 व्या स्थानावर गेले आहेत.अंबानी यांनी जियोचे भाग विकूण कमावले 1.17 लाख कोटी रुपये.

मुंबई - जगातील दिग्गज उद्योगपती वॉरेन बफेट यांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स नुसार, वॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती 67.9 अब्ज डॉलर एवढी आहे. तर अंबानी यांची एकूण संपत्ती 68.3 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. यानंतर आता जागातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी 8 व्या क्रमांकावर आले आहेत. तर बफेट 9 व्या स्थानावर गेले आहेत.

अंबानी यांनी जियोचे भाग विकूण कमावले 1.17 लाख कोटी रुपये -
मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 मार्चला आरआयएलच्या प्रति इक्विटी शेअर्सची किंमत बीएसईवर 864 रुपए एवढी होती. मात्र आता ती वाढून 1,820 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच काळात मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममधील आपला वाटा विकूण 15 अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती कमावली आहे.

जियो प्लॅटफॉर्मचे व्हॅल्यूएशन 4.91 लाख कोटी रुपये - 
अंबानी यांच्या जिओमध्ये फेसबूक, सिल्वर लेक, केकेआर, अबूधाबी इन्व्हेस्टमेन्टसह एकूण 12 गुंतवणूक दारांनी इंट्रेस दर्शवला. या मोबदल्यात जिओची 25 टक्क्यांच्या जवळपास इक्विटी विकली गेली. ही इक्विटी 4.91 लाख कोटी रुपयांच्या व्हॅल्यूएशनवर विकण्यात आली. याच आठवड्यात बीपी पीएलसीने रिलायन्स फ्यूल रिटेल बिझनेसचे शेअर्स खरेदी केले. यासाठी त्यांनी तब्बल 1 अब्ज डॉलर मोजले आहेत. 

आरआयएलचा शेअर मार्चपासून आतापर्यंत दुप्पट वाढला -
आरआयएलचा शेअर वधारल्याने मुकेश अंबानी यांना जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळाले आहे. वॉरेन बफे यांची पोझिशन या आठवड्यात घसरली. कारण त्यांनी 2.9 अब्ज डॉलर चॅरिटीमध्ये दान केले. 89 वर्षीय वॉरेन बफे यांनी 2006 पासून बर्कशायर हॅथवेचे 37 अब्ज डॉलरहून अधिक दान केले आहे. यामुळे त्यांचा रँक खाली आला आहे. याच काळात त्यांच्या स्टॉकचे प्रदर्शनदेखील फार चांगले राहिले नाही.

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोना व्हॅक्सीनसाठी 'या' भारतीय उद्योगपतीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला दिले 3300 कोटी रुपयांचे अनुदान, म्हणाले...

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Web Title: Mukesh Ambani Now Richer Than Warren Buffett with $68.3 billion 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.