मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Published: June 11, 2016 03:55 AM2016-06-11T03:55:27+5:302016-06-11T03:55:27+5:30

तीन शतकांची परंपरा असलेल्या श्री संत मुक्ताई पालखीचे शुक्रवारी सकाळी मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास करीत

Muktai Palkhi reached Pandharpur | मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Next

जळगाव : तीन शतकांची परंपरा असलेल्या श्री संत मुक्ताई पालखीचे शुक्रवारी सकाळी मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास करीत ही पालखी ३४ दिवसांनी १२ जुलै रोजी पंढरपुरला पोहचेल.
वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी कोथळी येथील मंदिर परिसरात गर्दी केली होती़ विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह मध्यप्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर वारकरी यात सहभागी झाले आहेत.
सकाळी प्रदक्षिणेनंतर महाद्वारातून पालखी रथात आणण्यात आली. हा क्षण डोळ््यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रात सर्वात आधी ही पालखी निघते. जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करते. (प्रतिनिधी)

Web Title: Muktai Palkhi reached Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.