मुकुंद अभ्यंकर यांची जामिनावर सुटका
By admin | Published: July 19, 2016 04:31 AM2016-07-19T04:31:48+5:302016-07-19T04:31:48+5:30
अटक करण्यात आलेले कॉसमॉस बँकेचे समूह अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर (वय ७९, रा. शिवाजीनगर) यांची न्यायालयाने सोमवारी जामिनावर सुटका केली.
पुणे : कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले कॉसमॉस बँकेचे समूह अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर (वय ७९, रा. शिवाजीनगर) यांची न्यायालयाने सोमवारी जामिनावर सुटका केली. अपघातात अरूंधती गिरीश हसबनीस (वय २७, रा. नऱ्हेगाव) मृत्युमुखी पडल्या होत्या. या प्रकरणी विक्रम धूत (वय ३५, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. १७ जुलै
रोजी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर ही घटना घडली होती़
हसबनीस या त्यांच्या दुचाकीवरून भांडारकर रस्त्यावरून गुडलक चौकाकडे जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यामुळे पडून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभ्यंकर यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)