वेळप्रसंगी रेल्वेने मुळा धरणाचे पाणी
By admin | Published: March 31, 2016 01:55 AM2016-03-31T01:55:44+5:302016-03-31T01:55:44+5:30
नगर जिल्ह्याची तहान भागवून मुळा धरणात साडेचार टीएमसी मृतसाठा शिल्लक आहे़ तो जुलैपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत़ त्यामुळे वेळप्रसंगी मुळा धरणाच्या
- अण्णा नवथर, अहमदनगर
नगर जिल्ह्याची तहान भागवून मुळा धरणात साडेचार टीएमसी मृतसाठा शिल्लक आहे़ तो जुलैपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत़ त्यामुळे वेळप्रसंगी मुळा धरणाच्या मृतसाठ्यातून मराठवाड्याला रेल्वेद्वारे पाणी देता येऊ शकते, या निर्णयापर्यंत सरकार आले आहे़
दुष्काळात मराठवाड्याला पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून पूर्वी नाशिक व नगरमधील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडल्यानंतरही मराठवाड्यात पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे़ लातूरमध्ये पाणीबाणी लागू झाली आहे़ कोणत्या धरणातून सहजपणे लातूरला पाणीपुरवठा करता येईल, कोणत्या धरणात पाणी आहे आणि रेल्वेस्टेशन त्यापासून किती अंतरावर आहे याची चाचपणी प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू आहे़
मुळा धरणापासून ८ ते १० कि. मी. अंतरावर देहरे रेल्वेस्टेशन आहे, तर वांबोरी स्टेशनवरून रेल्वेत पाणी भरणे शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले़ तेथपर्यंत पाणी आणून ते वॅगनमध्ये भरून लातूरला रवाना करण्यावर प्रशासकीय स्तरावर मंथनही सुरू आहे़ जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला़ तांत्रिकदृष्ट्या कोणत्या धरणातून पाणी देता येईल, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते़