मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग; तपास पथक दिल्लीला रवाना, तक्रारदारांचा आकडा ४३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:38 AM2017-12-20T02:38:01+5:302017-12-20T02:38:21+5:30
मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.
मुंबई : मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचे तपास पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडला आहे. सोमवारी ३५ खातेदारांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. मंगळवारी तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत अंदाजे २० लाखांहून अधिक रक्कम खात्यांतून काढून घेण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याने, तपास पथक दिल्लीला गेले आहे. तक्रारदारांचा आकडा १०० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.