मुंबईत २,२६७ तर ठाण्यात ८0५ उमेदवार रिंगणात

By admin | Published: February 8, 2017 04:58 AM2017-02-08T04:58:58+5:302017-02-08T04:58:58+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले

In Mumbai 2,267 and Thane 805 candidates in the fray | मुंबईत २,२६७ तर ठाण्यात ८0५ उमेदवार रिंगणात

मुंबईत २,२६७ तर ठाण्यात ८0५ उमेदवार रिंगणात

Next

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील २२७ जागांसाठी एकूण २ हजार २६७ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. तर शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पक्षासह मोठ्या प्रमाणावर अपक्षांनी अर्ज दाखल केल्याने बहुतेक प्रभागांमध्ये बहुरंगी लढत आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार तर उल्हासनगरात ७८ जागेसाठी ४७९ उमेदवार उभे ठाकले असून बहुतेक वॉर्डात तिरंगी अथवा चौरंगी लढती अपेक्षित आहेत.
एकीकडे सर्वच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज भरले असले तरी मुंबईतील तीन प्रभागांमध्ये मात्र उलट स्थिती आहे. प्रभाग क्रमांक १०० आणि १५८ मध्ये शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस अशा तीनच पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत तर १२६ मध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपा अशी तिहेरी लढत आहे. या तीन ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. तर १० प्रभागांमध्ये चौरंगी लढत आहे. याशिवाय प्रभाग ५, ६, ९, २१, २७, ३२, ४६, ५९, ६७, ९९, १८६, १९०, २१७, २१८, २१९ आणि २२४ या सोळा ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
ठाण्यात विद्यमान ९८ नगरसेवकांचा उमेदवारांमध्ये समावेश असून शेवटच्या दिवसापर्यंत ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून तब्बल २८८ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये शिवसेना आणि भाजापमधील अधिक बंडखोरांचा समावेश आहे. आता बुधवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार असून, तब्बल २५ वर्षाच्या मैत्रीनंतर ठाण्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना विरुद्ध आघाडी आणि मनसे असा चौरंगी सामना ठाण्यात रंगणार आहे. येत्या २१ फेबु्रवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक हे पालिकेत निवडून जाणार आहेत. यामध्ये ६६ महिलांचा समावेश असणार आहे. प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले जयनाथ पूर्णेकर यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Mumbai 2,267 and Thane 805 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.