मुंबई ३५ अंश; कमाल तापमानाचा वाढता पारा ठरणार ‘ताप’दायक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 05:54 AM2020-02-12T05:54:18+5:302020-02-12T05:54:37+5:30
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातून थंडीने ‘पॅक अप’ केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारी केली असतानाच, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी बाराच्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण, अडीचच्या सुमारास पुन्हा रखरखीत ऊन आणि काही काळ वातावरणात उठलेली धूळ, अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव मंगळवारी मुंबईकरांनी घेतला. हवेतला किंचितसा गारवाही हळूहळू कमी होत असल्याने, कमाल तापमानाचा वाढता पारा मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता, मुंबईकरांची मंगळवारची दुपार ‘ताप’दायक ठरली. कमाल तापमान ३५ अंश आणि वातावरणात उठलेल्या धुळीने येथील वातावरण काहीसे धूळसदृश्य झाले होते.
दरम्यान, दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवसाच्या वातावरणातील गारवा कमी होत असला, तरी रात्रीच्या हवेतला गारवा किंचित का होईना, टिकून असल्याचे चित्र आहे.
नागपूरमध्ये सर्वांत कमी किमान तापमान
च्राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११.८ अंश
नोंदविण्यात आले.
च्१२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
च्१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मुंबई आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.
राज्यातील शहरांचे मंगळवारचे कमाल तापमान
मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी १२च्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण