मुंबईत जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमीच पाऊस

By admin | Published: July 1, 2016 08:24 PM2016-07-01T20:24:45+5:302016-07-01T20:24:45+5:30

मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाने चाकारमान्यांची नाकाबंदी केली आहे़ मात्र तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकवत असल्याने गेल्यावर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस

In Mumbai, 50 percent less rain compared to last year | मुंबईत जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमीच पाऊस

मुंबईत जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमीच पाऊस

Next

मुंबई - मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाने चाकारमान्यांची नाकाबंदी केली आहे़ मात्र तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकवत असल्याने गेल्यावर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़ त्यामुळे आवश्यक जलसाठ्याचे आठ टक्केच साठा तलावांमध्ये जमा झाला आहे़
मान्सून यंदा मुंबईत विलंबानेच दाखल झाला़ गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतलेली नाही़ सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे पाणी पाणी केले़ तरी तलाव क्षेत्र मात्र तहानलेलेच आहेत़ हा पाऊस गेल्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमीच आहे़ त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम एक लाख १० हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्याची, माहिती पालिका प्रशासनाने आज दिली़
वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे़ गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडला होता, तरीही जून महिन्यात तलावांमध्ये तीन लाख ३८ हजार २१७ दशलक्ष लीटर जलसाठा होता़ मात्र यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच तलावांमध्ये पाऊस फिरकलेला नाही़ त्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले आहे़ (प्रतिनिधी)

- मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़
- गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून २० टक्के पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़
- मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये
तलाव-कमाल किमान आजची स्थितीआजचा पाऊस(मि़मी़)
मोडक सागर १६३़१५१४३़२६ १४५़९२ १६़४०
तानसा१२८़६३ ११८़८७ १२०़८२ २४़२०
विहार८०़१२ ७३़९२ ७५़९३ १४२़८०
तुळशी१३९़१७ १३१़०७ १३६़०९ १७९़५०
अप्पर वैतरणा ६२७़१७६१९़९ ५९४़२५ १०़००
भातसा१६६़५३ १२९़३६ १०७़६८ ३४़००
मध्य वैतरणा २८५़००२२०़०० २४४़८४ २१़४०
एकूण २०१६ -११०६१९ दशलक्ष लीटर
२०१५- ३३८२१७ दशलक्ष लीटर

 

Web Title: In Mumbai, 50 percent less rain compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.