मुंबईत ६५ वर्षात ५१ वेळा झाला २०० मिमी पाऊस; हवामान विभागाच्या अभ्यासातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 01:13 PM2017-09-22T13:13:05+5:302017-09-22T13:24:12+5:30

२९ ऑगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी मुंबई तसंच कोकणात जोरदार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं

In Mumbai, 51 times in 200 years of rain; Explain the information through the study of the weather department | मुंबईत ६५ वर्षात ५१ वेळा झाला २०० मिमी पाऊस; हवामान विभागाच्या अभ्यासातून माहिती उघड

मुंबईत ६५ वर्षात ५१ वेळा झाला २०० मिमी पाऊस; हवामान विभागाच्या अभ्यासातून माहिती उघड

Next
ठळक मुद्दे२९ ऑगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी मुंबई तसंच कोकणात जोरदार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतंसंपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचं वर्णन तुंबई असं केलं गेलं. पण असं असलं तरी इतका पाऊस पडण्याची ही काही पहिली वेळ नाही.

- विवेक भुसे
पुणे : २९ ऑगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी मुंबई तसंच कोकणात जोरदार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचं वर्णन तुंबई असं केलं गेलं. पण असं असलं तरी इतका पाऊस पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. मुंबईत एकाच दिवसात २०० मिमी पाऊस होणं हे सामान्य असल्याचं गेल्या ६५ वर्षातील पावसाची आकडेवारी पाहिली असता दिसून येतं आहे. पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात १९५० ते २०१५ या ६५ वर्षात मुंबईत तब्बल ५१ वेळा एका दिवसात २०० मिमी पाऊस झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पाऊस हा  नेहमीसारखाच असला तरी पावसाच्या पाण्याचा निचरा न होणं, हे त्यामागील कारण असल्याचे दिसून येत आहे. पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ ए.के श्रीवास्तव यांनी याबाबत केलेल्या अभ्यासात हे दिसून आलं आहे.  

मुंबई व कोकण विभागात पावसाळ्यामध्ये एका दिवसात २०० मिमी पाऊस होणं ही तशी सामान्य घटना आहे.  मागील ६५ वर्षात अनेकदा असं आढळून आले आहे, की एकाच वर्षात एकाच दिवसात २०० मिमी पाऊस दोनदा काही वेळा तीनदा पडला आहे. हवामान विभागाने त्या त्या वेळी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करुन त्याप्रमाणे मुंबई महापालिका, राज्य शासन तसेच संबंधित सर्व यंत्रणांना त्याचा अलर्ट दिलेला आहे. अनेकदा पहिल्या दिवशी इतका पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याचा जोर कमी असल्याची नोंद आहे. २९ ऑगस्टच्या मॉडेलच्या पूर्वानुमानात ते दिसून आलं होतं पण त्यावेळी तो पाऊस रात्रीतून गुजरातच्या दिशेने गेला होता.

मुंबई व कोकणात पडणारा इतका पाऊस हा हवामानाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वसाधारण आहे. मागील पाच वर्षाचा विचार केला तर २०११ मध्ये २८ व २९ ऑगस्टला सांताक्रुझ येथे अनुक्रमे २२४ मिमी आणि २३२ मिमी पाऊस पडला होता़ त्यानंतर २०१२ मध्ये एका दिवसात इतका पाऊस झाला नाही. २४ जुलै २०१३ रोजी १५६ मिमी, ३ जुलै २०१४ रोजी २०७ मिमी आणि १९ जुलै २०१५ मध्ये २८३ मिमी पाऊस एकाच दिवशी पडला होता. तसंच २००९ मध्ये ५ व १५ जुलै, २००७ मध्ये २४ जून आणि १ जुलै तसेच २००५ मध्ये तर ५ व २७ जुलै आणि १ ऑगस्ट अशा एका वर्षात दोन किंवा तीन वेळा एकाच दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईत पडला आहे. हे पाहता एका दिवशी २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस मुंबईमध्ये साधारणपणे नियमित होत असतो़ पण, गेल्या काही वर्षांमध्ये पावसामुळे मुंबई ठप्प होण्याचे प्रमाण दिवसें दिवस वाढत असले तरी त्याला कारण पाऊस हे केवळ निमित्त असल्याचे दिसून येते. त्याला इतर कारणाने कारणीभूत असल्याचे दिसून येईल, असे त्यांनी सांगितले़.

- १९५० ते २०१५ या ६५ वर्षात ५१ वेळा एकाच दिवसात २०० मिमी पाऊस झाला होता़
- १० वर्षामध्ये एकाच पावसाळ्यात २ वेळा २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस 
- २ वर्षे एकाच हंगामात तीन वेळा २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस (१९५८ आणि २००५ )
- १९५२ मध्ये ४ वेळा एकाच दिवसात २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस 

मुंबईत (सांताक्रुझ वेधशाळा) एकाच दिवसात पडलेला सर्वाधिक पाऊस

सकाळी साडेआठ ते दुसºया दिवशी सकाळी साडे आठ या वेळेत पडलेला पाऊस

 

वर्ष                             पडलेला पाऊस (मिमी)

२१ जून १०५२                     208

२२ जून १९५२                      207

१६ जुलै १९५२                      361

१७ जुलै १९५२                     305

१९ जुलै १९५३                    305

२८ जुलै १९५३                     310

२ जुलै १९५४                      224

७ आॅगस्ट १९५४                256

२६ जुलै १९५८                    232

११ आॅगस्ट १९५८             218

१० सप्टेंबर १९६२             210

१६ जुलै १९६५                  372

२१ जुलै १९६५                   207

१९ जुलै १९६६                  291

२९ जुलै १९६७                  201

३ जुलै १९६९                    201

२४ जून १९७१                 244

२ जुलै १९७२                  203

५ जुलै १९७४                  375

९ जुलै १९७५                 223

३१ जुलै १९७५              221

५ आॅगस्ट १९७६           264

२३ सप्टेंबर १९८१          318

१९ जुलै १९८१              275

२१ जुलै १९८२                 208

१७ जुलै १९८३              253

२ जुलै १९८४                 204

१३ सप्टेंबर १९८४           215

१७ जून १९८५                223

९ जून १९९१                351

१० जून १९९१              399

१२ आॅगस्ट १९९२        215

२३ सप्टेंबर१९९३           312

२३ आॅगस्ट १९९७         346

१० आॅगस्ट १९९८          211

१३ जुलै२०००                351

२७ जुलै २००५              944

१ आॅगस्ट २००५           208

१० सप्टेंबर २००५       223

५ जुलै २००६             231

७ आॅगस्ट २००६        224

२४ जून २००७           209

१ जुलै २००७            256

५ जुलै २००९           243

१५ जुलै २००९           274

२८ आॅगस्ट २०११      220

२९ आॅगस्ट २०११      232

२४ जुलै २०१३          215

३ आॅगस्ट २०१४          207

१९ जून २०१५             283

Web Title: In Mumbai, 51 times in 200 years of rain; Explain the information through the study of the weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.