दहावीत मुंबईतील दोघांना ९९ टक्के
By admin | Published: June 4, 2017 01:35 AM2017-06-04T01:35:10+5:302017-06-04T01:35:10+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे पाच टक्क्यांनी घटले असून, दिल्ली भागात तर ही घट १३.६७ टक्के आहे. चेन्नई विभागाचा निकाल हा ९९.६२ टक्के लागला आहे. जळगावच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत. तर मुंबईतील दोघांना ९९ टक्के मिळाले.
सीबीएसईतर्फे बोर्डाची परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती, तर शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून घेण्यात आली होती. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत एकूण ९०.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर त्रिवेंद्रम विभागातून सर्वाधिक म्हणजे ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग आहे. या विभागातून ९९.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
चेन्नई विभागातून शाळेतून एकूण २३ हजार ३८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३ हजार ३३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बोर्डातर्फे परीक्षेला १ लाख ५४ हजार ८६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ लाख ५४ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगीरीत्या २१० विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील फक्त ७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालाचा
टक्का घसरला
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे पाच टक्क्यांनी घटले असून, दिल्ली भागात तर ही घट १३.६७ टक्के आहे. चेन्नई विभागाचा निकाल हा ९९.६२ टक्के लागला आहे. जळगावच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत.
अभ्यासाचा एकच मंत्र आहे, तुम्ही समाधानी असाल तर तुमचा अभ्यास झाला आहे. मी असाच अभ्यास केला. मी खूप ताण घेऊन वर्षभरात कधीच अभ्यास केला नाही. एका दिवसात एका विषयाचा अभ्यास करायचे. अभ्यासातून वेळ काढून बाहेर जाऊन खेळायचे. मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे आता ‘नीट’चा अभ्यास सुरू करणार आहे. मला बालरोगतज्ज्ञ व्हायचे आहे.
- नीर सावला, ९९.२ टक्के
वर्षभरात मी अभ्यासाचा ताण घेतला नव्हता. त्यामुळेच हे शक्य झाले. पाठ्यपुस्तकांचा पूर्ण अभ्यास केला होता. मला इंजिनीअरिंग करायचे आहे. पण मी आयआयटीमध्ये जाणार नाही. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबद्दल विचार सुरू आहे.
- आयुष शहा, ९९.४ टक्के
अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, देहरादून आणि थिरुअनंतपुरम विभागांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून उर्वरित विभागांचा निकाल नंतर जाहीर केला जाईल, असे सीबीएसईने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. एकूण ९०.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात मुलांनी बाजी मारली असून मुलींपेक्षा मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ०.९ टक्के इतके अधिक आहे. त्रिवेंद्रम विभागातून सर्वाधिक म्हणजे ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग आहे.
जळगावातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या आयुषी राजेंद्र पायघन या विद्यार्थिनीने ५०० पैकी सर्वाधिक ४९८ (९९.६० टक्के) गुण मिळविले आहेत. संस्कृत व विज्ञान दोनच विषयात तिला ९९ तर इतर सर्व विषयात १०० गुण मिळाले आहेत.
सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी विनीत डोके याने ५०० पैकी ४९७ गुण (९९़४ टक्के) मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे़ त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. हे यश पुढेही कायम राखण्याचे आव्हान आता सर्व गुणवंतंसमोर आहे.