मुंबईत महिलेवर अज्ञाताचा हल्ला, आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 08:33 AM2017-01-06T08:33:10+5:302017-01-06T08:34:56+5:30
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात महिला जखमी झाली असून उपचारासाठी तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका महिलेवर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात महिला जखमी झाली असून उपचारासाठी तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही महिला रात्री ऑफिसमधून घरी परतत असताना हा हल्ला झाला. एकीकडे बंगळुरुमधील विनयभंगाच्या घटनेवरुन महिला सुरक्षेवर प्रश्चचिन्ह उपस्थित होत असताना मुंबईतील या घटनेमुळे चिंता अजून वाढवली आहे.
महिलेवर हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. महिलेवर हल्ला करणा-याची ओळख अद्याप पटलेली नाही. एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही घटना घडली तेथून काहीच अंतरावर पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. तरीही हा हल्ला झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
Girl assaulted by a man in Mumbai's Tardeo Police Station area last night leading to injuries, police says further probe is underway. pic.twitter.com/cMuyF2Xbnt
— ANI (@ANI_news) 6 January 2017