मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या हिताचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:18 AM2018-07-20T04:18:15+5:302018-07-20T04:18:34+5:30
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, हा प्रकल्प देशाच्या व राज्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले.
नागपूर : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असून, हा प्रकल्प देशाच्या व राज्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, बुलेट ट्रेनसाठी ठाणे व पालघरमधील जी जमीन संपादित केली जाणार आहे, त्यामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान होणार नाही. याचा शेतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. काही ठिकाणी ही ट्रेन भूमिगत आहे. शेतक ºयांची व ग्रामसभेची सहमती घेण्यासाठी जनसुनावणी सुरू आहे. जनसुनावणीद्वारे सल्लामसलतीचा उद्देश या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दूर करणे हा आहे. यात ग्रामसभांचे महत्त्व कुठेही कमी होऊ दिले जाणार नाही. वनजमिनींच्या कायद्याचे काटेकोर पालन केले जाईल. वनक्षेत्राचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकºयांना भरपाईची रक्कम देण्याबाबत कोणतेही वेगळे धोरण आखण्यात आलेले नाही.
विमानसेवा सुरू झाली तेव्हा सुरुवातीला एक टक्का प्रवासी होते. आता ही संख्या तीन टक्क्यांवर गेली आहे. जपान व चीनचा विकास बुलेट ट्रेनमुळेच झाला आहे. बुलेट ट्रेनचे १० वर्ष भाडे कमी असणार आहे.