मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पूल १६ सप्टेंबरपासून बंद

By admin | Published: September 13, 2016 02:27 PM2016-09-13T14:27:38+5:302016-09-13T14:32:36+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु आहे.

The Mumbai-Ahmedabad road has been closed since September 16 | मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पूल १६ सप्टेंबरपासून बंद

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पूल १६ सप्टेंबरपासून बंद

Next

ऑनलाइन लोकमत 

भाईंदर, दि. १३ -   मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक ८ वरील उल्हासनदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल तिसऱ्यांदा दुरुस्तीयोग्य झाल्याने तज्ज्ञांकडून त्याची तपासणी सुरु असून त्याचा  अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दुरुस्तीसाठी त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणान) कडून सांगण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मात्र १६ पासूनच वाहतूक बंद करण्याचे आदेश जरी केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

एनएचएआयने १९७३ मध्ये मुंबई ते गुजरातदरम्यानची वाहतूक जलद करण्यासाठी वसई-विरार व मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीवरून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दोन पदरी वाहतूक पूल बांधला. १९ वर्षांतच या पुलाच्या दुरुस्तीने डोके वर काढले. १९९२-९३ मध्ये दुरुस्तीसाठी हा पूल दोन महिने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये याच पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्याची बाब उघडकीस आल्याने तो दुरुस्तीसाठी तब्बल दिड वर्षे त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. यानंतरही या पुलाच्या पडझडीला सुरुवात झाल्याने ऑगस्टमध्ये महाड येथील पुलाच्या दुर्घटनेमुळे त्याची दुरुस्तीसुद्धा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने ५ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर ४ सप्टेंबरपासून एनएचएआयच्या निर्देशानुसार आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) व एनएचएआयच्या तज्ज्ञांकडून ४३ वर्षीय व १९९५ मध्ये लागतच बांधलेल्या नवीन वाहतूक पुलांची तपासणी सुरु झाली. त्यावेळी जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, गणेशोत्सव काळात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर दुरुस्ती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी माहिती जिल्हा प्रशासनासह वाहतूक विभाग व स्थानिक पोलिसाना देण्यात आली. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी १६ सेप्टेंबरपासून जुना वाहतूक पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. तत्पूर्वी वाहतूक विभागाने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करुन  हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवली आहे. परंतु, हा पूल नेमक्या कोणत्या  तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करायचा त्यासाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे. या  पूलाच्या दुरुस्तीसाठी १५  दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला सुमारे ६ महिन्यांचा कालावधी  लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत एनएचएआयचे  व्यवस्थापक  दिनेश अग्रवाल म्हणाले, वाहतूक मंत्रालय, आयआरबी व एनएचएआयसाच्या तज्ज्ञांकडून  अद्याप पुलाची तपासणी सुरु असून त्याचा अहवाल १५ सेप्टेंबरपर्यंत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अहवालातील सूचनेनुसारच दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेऊन त्या पुलावरील वाहतूक  पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 
 
जुन्या पुलाच्या दुरुस्तीनंतर लगतच्या पुलाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येथील  वाहतूक कोंडी वर्षभर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुरुस्तीदरम्यान ठाणे येथून गुजरातकडे जाणारी वाहतूक माजिवडा जंकशन, माणकोली नाका, अंजूर फाटा, चिंचोटी मार्गे महामार्ग क्रमांक ८ वर वळविण्यात येणार आहे. तर मुंबईहून गुजरातकडे जाणारी व मुंबईकडे येणारी दोन्ही बाजूंकडील वाहतूक नवीन पुलावरून सुमारे १५ ते २० मिनिटांच्या थांब्याने सोडण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
 

Web Title: The Mumbai-Ahmedabad road has been closed since September 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.