मुंबई विमानतळावर २५ किलो सोने पकडले

By Admin | Published: May 12, 2014 01:33 AM2014-05-12T01:33:25+5:302014-05-12T01:33:25+5:30

दुबईवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या दोन प्रवाशांकडून रविवारी हवाई गुप्तचर विभागाने तब्बल २५ किलो सोने हस्तगत केले असून, ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

Mumbai airport caught 25 kilos of gold | मुंबई विमानतळावर २५ किलो सोने पकडले

मुंबई विमानतळावर २५ किलो सोने पकडले

googlenewsNext

मुंबई : दुबईवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या दोन प्रवाशांकडून रविवारी हवाई गुप्तचर विभागाने तब्बल २५ किलो सोने हस्तगत केले असून, ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साडेसहा कोटी रुपये आहे. हवाई गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मोहंमद अबूबकार आणि मावीन मोहंमद अस्लम हे दोन्ही प्रवासी दुबईमार्गे वेगवेगळ््या विमानांनी मुंबईत दाखल झाले. या दोघांनी विमानतळावरील कर्मचार्‍यांप्रमाणे टी-शर्ट आणि गळ््यात लटकविलेले आयकार्ड असा वेष परिधान केला होता. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांनी हटकले व त्यांची झडती घेतली. पहाटे मोहंमद अबूबकार हा प्रवासी दुबईवरून मस्कतमार्गे विमानतळावर दाखल झाला. त्याच्या एका बॅगेमध्ये पोलिसांना एक किलोच्या १३ सोन्याच्या विटा आणि १० तोळे वजनाच्या दोन विटा आढळल्या. त्याची किंमत ३ कोटी ३९ लाख आहे. दुसर्‍या घटनेत सकाळी ८ वाजता मावीन अस्लम याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत एक किलो वजनाच्या १२ विटा आणि १० तोळे वजानाच्या २ विटा सापडल्या. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Mumbai airport caught 25 kilos of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.