मुंबई ते अजिंठा हवाईसेवा लवकरच!
By admin | Published: October 31, 2014 02:11 AM2014-10-31T02:11:06+5:302014-10-31T02:11:06+5:30
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुंबई ते अजिंठा हवाईसेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन खाजगी कंपन्यांसोबत प्रशासनाने चर्चाही सुरू केल्याचे सूत्रंनी सांगितल़े
Next
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने औरंगाबादेत येतात. विमानाने येणा:या पर्यटकांना औरंगाबादहून अजिंठा गाठण्यासाठी वाहनाद्वारे ये-जा करावी लागते. यामध्ये वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुंबई ते अजिंठा हवाईसेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन खाजगी कंपन्यांसोबत प्रशासनाने चर्चाही सुरू केल्याचे सूत्रंनी सांगितल़े
अजिंठा लेणी पाहण्यासाठी जगभरातून महिन्याला दीड हजारांहून अधिक विदेशी पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक मुंबईहून विमान किंवा रेल्वेने औरंगाबादेत दाखल होतात. औरंगाबादहून 1क्9 कि.मी. वाहनाने प्रवास करून त्यांना अजिंठा येथे पोहोचावे लागते. काही विदेशी पर्यटकांना ही प्रक्रिया कठीण वाटते. मुंबईहून थेट अजिंठा लेणीर्पयत किमान हेलिकॉप्टर सेवा असावी, अशी मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद ते शिर्डी आणि अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबत विचारविमर्श केला होता. मात्र, ही योजना प्रत्यक्षात अमलात आली नव्हती. आता एमटीडीसीच्या मुंबई कार्यालयाने यासंदर्भात पुढाकार घेतला असून, याबाबतच लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली. अजिंठा येथे एमटीडीसीच्या जागेवर हेलिपॅड बांधले आहे. मागील अनेक वर्षापासून या हेलिपॅडचा वापरच होत नसल्याचे दिसून आले आह़े मुंबईहून हेलिकॉप्टर सेवा सुरू केल्यास पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे. (प्रतिनिधी)
पर्यटकांना परवडेल
असे भाडे
विमानाने मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी किमान पाच हजार रुपये आणि औरंगाबाहून टॅक्सीद्वारे अजिंठा येथे जाण्यासाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो. मुंबईहून रेल्वेने पर्यटक आले तरी किमान 7क्क् ते 8क्क् रुपये लागतात. खर्चाचा सर्व हिशेब गृहीत धरून मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवेचे भाडेही पर्यटकांना परवडेल असेच ठेवण्याचा मानस एमटीडीसीने व्यक्त केला आहे.