मुंबईत अडीच कोटींची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त
By admin | Published: January 12, 2017 06:27 PM2017-01-12T18:27:50+5:302017-01-12T18:37:48+5:30
मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या कारवाईत बनावट सौंदर्य प्रसाधनाचे जप्त करण्यात आली आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या कारवाईत अडीच कोटींची बनावट सौंदर्य प्रसाधनाचे जप्त करण्यात आली आहेत.
बनावट सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन होत असल्याची गोपनीय माहिती एफडीएला प्राप्त झाली होती. त्यानुसार सहआयुक्त बृहन्मुंबई विभाग थॉमस यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून सारंग स्ट्रीट, भुलेश्वर येथील कारखान्यांवर गरुवारी छापा टाकण्यात आला. यावेळी मोहम्मद खातीब शेख मोहम्मद जारिफ शेख, प्रविण ढिल्ला आणि महेश लालजी वारचंद हे याठिकाणी विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, या कारवाईत एफडीएने २.५ कोटींची बनावट उत्पादनेही एफडीएने जप्त केली आहेत. या बनावट उत्पादनांमध्ये लॅक्मे, लॉरिअल, बेबी लिप्स, मॅट्रीक्स अशा नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे.
या तिघांवर विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती एफडीएने दिली. ‘लोकमत’ने या पूर्वी बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेवर प्रकाशझोत टाकणारे ‘सौंदर्याचा काळाबाजार’ हे स्टींग ऑपरेशन केले होते.