मुंबई - पुणे महामार्ग टाळा, सकाळपासून गाड्यांच्या लांब रांगा
By admin | Published: December 24, 2016 12:33 PM2016-12-24T12:33:07+5:302016-12-24T12:33:07+5:30
वीकएंड आणि नाताळच्या सुट्टीमुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सलग सुट्ट्या असल्याने बाहेर फिरायला जायचा विचार करत असाल तर मुंबई - पुणे महामार्गाने जाणं टाळा. वीकएंड आणि नाताळच्या सुट्टीमुळे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून बसावं लागत आहे. टोलनाक्यांवरही वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सुकेळी खिंडीत टँकर बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात आणि गोव्यात नाताळसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण असल्यानं फक्त दोनचं लेन सुरु आहेत. त्यामुळे महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे.