"यह तो झांकी है... मुंबई महापालिका अभी बाकी है...!", मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ट्विट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 09:43 AM2022-06-30T09:43:04+5:302022-06-30T09:45:23+5:30

BJP Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्विट करत आपल्या पुढील टार्गेटचे संकेत दिले आहे.  

Mumbai BJP's tweet after the resignation of the Chief Minister Uddhav Thackeray | "यह तो झांकी है... मुंबई महापालिका अभी बाकी है...!", मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ट्विट! 

"यह तो झांकी है... मुंबई महापालिका अभी बाकी है...!", मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ट्विट! 

googlenewsNext

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. यातच आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्विट करत आपल्या पुढील टार्गेटचे संकेत दिले आहे.  

मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Elections) काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असतानाच सर्वच पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मुंबई भाजपने ट्विट करत म्हटले की, "यह तो झांकी है.... मुंबई महापालिका अभी बाकी है...!". या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता स्थापन होऊ शकते. आज किंवा उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसेच, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. 

यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार 
मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने ९१ जागा जिंकल्या होत्या तर भाजपाला ८३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु काही वर्षापूर्वी मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ ९७ वर पोहचले. यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वार्ड पुर्नरचनेत कुणाला फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालात कळेल.

Read in English

Web Title: Mumbai BJP's tweet after the resignation of the Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.