मुंबईची झाली तुंबई ! उद्या कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 06:53 PM2017-08-29T18:53:00+5:302017-08-29T20:20:36+5:30
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व कॉलेज- शाळांना बुधवारीदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणा केली आहे.
मुंबई, दि. 29 - मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व कॉलेज- शाळांना बुधवारीदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणा केली आहे. मंगळवारीदेखील अर्ध्या दिवसानंतर कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
With today's heavy downpour &predictions for heavier rainfall; schools,college authorities instructed to remain closed tomorrow #MumbaiRains
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 29, 2017
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण करुन दिली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. एनडीआरएफच्या 3 टीम मुंबईत तयार असून पुण्याहून आणखी 2 टीम रवाना झाल्या आहेत.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महपालिकेची कंट्रोल रूम सक्रिय असून, पाऊस / शहराशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी १९१६ ला कॉल करा असं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहनही केलं आहे. 'मुंबईतील सर्व पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अतिशय आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा', असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. 'मुंबईत गेल्या १ तासामध्ये ५२ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांमध्ये अधिक पाऊस अपेक्षित आहे', असंही त्यांनी सांगितलं आहे.
Hon PM @narendramodi expressed concern over the situation and has extended all the necessary help from GoI.#MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 29, 2017
CM @Dev_Fadnavis apprised Hon PM @narendramodi of the situation and also about the measures taken by various Govt authorities. #MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 29, 2017
Breaking: Hon PM @narendramodi called CM @Dev_Fadnavis and took information about heavy rains in Mumbai. #MumbaiRains (1/n)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 29, 2017
CM @Dev_Fadnavis taking review at #BMC Disaster Management Control Room#MumbaiRainspic.twitter.com/SqANeSCMcs
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 29, 2017
सांताक्रुझ परिसरात ९ तासात २९७ मिमी पाऊस
सांताक्रुझ येथील हवामान विभागात मंगळवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या ९ तासांत तब्बल २९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. त्यामुळे मुंबईकरांना २६ जुलैची पुन्हा एकदा आठवण झाली. याचवेळी कुलाबा वेधशाळेत दिवसभरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सांताक्रुझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १२६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतरच्या ३ तासात तब्बल १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा बहुदा विक्रमी पाऊस असू शकतो़ मंगळवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या २४ तासात कुलाबा १५१़८, सांताक्रुझ ८८़४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच डहाणू, तलासरी १९०, हर्णे १८०, महाबळेश्वर १७०, अलिबाग १६०, वलसाड, अकोला ७०, पेण २६०, म्हसाळा, मोखेडा २१०, जव्हार २००, मंडणगड, उरण १७०, माथेरान, रोहा, शहापूर १४०, अंबरनाथ, गुहागर, कल्याण, मुरबाड, मुरुड, उल्हासनगर, विक्रमगड १३०, चिपळूण, खेड, पनवेल, पोलादपूर, संगमेश्वर देवरुख १२०, ओझरखेडा १४०, मोहोळ १००, विदर्भातील अकोट १००, अर्जुनी मोरगांव, लाखंदूर, लाखानी, मोहाडी, पुसद ९० मिमी पाऊस झाला.
घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी), डुंगरवाडी २१०, ताम्हिणी, भिरा १९०, शिरगाव १८०, अम्बोणे १५०, दावडी १४०, धारावी १४०, भिवपूरी ११०, खोपोली, लोणावळा (आॅफिस), लोणावळा (टाटा)८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.