मुंबईत कोसळधार, मध्य रेल्वे कोलमडली
By admin | Published: July 17, 2017 08:43 PM2017-07-17T20:43:29+5:302017-07-17T20:43:29+5:30
गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण मुंबईत पाऊस सक्रिय झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईसह अनेक उपनगरांत आजपासून पाऊस सक्रिय झाला आहे. शहरात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे तब्बल 20-25 मिनिटे उशिरानं धावत आहे. जवळपास मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. दादर, वरळी, विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. तर तीन दिवस कोसळणा-या पावसानं रविवारी काहीशी विश्रांती घेतली आहे. किंचित कुठे तरी बरसलेल्या पावसाच्या एक-दोन सरी वगळता रविवारी दिवसभर मान्सूनचा शुकशुकाट असताना रात्री त्यानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.
दरम्यान, गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी येथील टेकडीवरील माती आणि झाडे उन्मळून, लगतच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर पडली. यात कुणालाही मार लागला नाही. रविवारी असलेल्या काहीशा आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राइव्ह येथे नेहमीप्रमाणे तरुणाईने गर्दी केल्याचे चित्र होते. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.