मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे झाले चक्क फेरीवाला

By admin | Published: July 28, 2014 05:15 PM2014-07-28T17:15:18+5:302014-07-28T17:15:18+5:30

बृहन्मुंबई महापालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून खुद्द आयुक्त सीताराम कुंटे यांची नोंदणी फेरीवाला अशा करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Mumbai Commissioner Seetaram Kunte became a chap hawker | मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे झाले चक्क फेरीवाला

मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे झाले चक्क फेरीवाला

Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - बृहन्मुंबई महापालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून खुद्द आयुक्त सीताराम कुंटे यांची नोंदणी फेरीवाला अशा करण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या मुंबई महापालिकेची फेरीवाला नोंदणी सुरू आहे या मोहिमेला अनेकांनी विरोधही केला आहे. सध्या पालिकेचे अधिकारी शहरात फेलीवाल्यांची पाहणी करत असून नोंदणी सुरू आहे. यामध्ये दादरमध्ये एका तीन फूट बाय पाच फूटाच्या स्टॉलची नोंदणी फेरीवाला म्हणून सीताराम कुंटे यांचे नावे करण्यात आल्याचे उघड झाले आहे. फेरीवाला पाहणी मोहीमेचे प्रमुख असलेल्या उपायुक्त आनंद वारगळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. नोंदणी करणा-या कर्मचा-यांकडून हा गलथानपणा झाल्याचे दिसत असून हे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये तीन लाख इतके फेरीवाले असणे ग्राह्य आहे. त्यामुळे ज्यांना परवाने हवे आहेत त्यांनी अर्ज करावा म्हणजे त्यानुसार फेरीवाला धोरण राबवता येईल असा पालिकेचा विचार आहे. तर केवळ या पालिकेच्या मोहिमेमुळे एकट्या दादर भागात नव्याने हजारो फेरीवाले तयार झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सगळा नोंी कारभार म्हणजे देखावा झाल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे.
पालिकेची माणसं केवळ १०० रुपये घेऊन फॉर्म देतात आणि कुठलाही शहानिशा, ओळखपत्र वगैरे न बघता देतील ती माहिती गोळा करतात असा आरोप करण्यात येत आहे.

Web Title: Mumbai Commissioner Seetaram Kunte became a chap hawker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.