मुंबई काँग्रेसच्या बैठकीत हमरीतुमरी
By Admin | Published: January 13, 2016 04:23 AM2016-01-13T04:23:41+5:302016-01-13T04:23:41+5:30
मुंबई काँग्रेसमधील गटबाजी मंगळवारी चव्हाट्यावर आली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत नसीम खान आणि अस्लम शेख हे दोन
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील गटबाजी मंगळवारी चव्हाट्यावर आली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत नसीम खान आणि अस्लम शेख हे दोन आमदार एकमेकांशी भिडले. दोन्ही नेते हमरीतुमरीवर आल्याने अखेर ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थीसाठी धाव घ्यावी लागली.
राहुल गांधी यांच्या १५ व १६ जानेवारी रोजीच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीसाठी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. त्या वेळी हा प्रकार घडला.
नेमके काय घडले?
षण्मुखानंद सभागृह उपलब्ध नसल्याने राहुल गांधी यांचा कार्यक्रम उत्तर मुंबईत ठेवण्यात येणार असल्याची माहिती निरुपम यांनी बैठकीत दिली. मात्र त्यास नसीम खान यांनी आक्षेप घेत हा कार्यक्रम पक्ष कार्यालयातच व्हावा, असा आग्रह धरला. याला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला. या प्रकारामुळे नाराज होत अस्लम शेख यांनी नसीम खान यांच्याबद्दल अनुद्गार काढले. शेख यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित खान समर्थकांनी हरकत घेतली. यानंतर दोन्ही गटांकडून घोषणाबाजी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचले. काँग्रेस नेत्यांनी मात्र बैठक शांततेत पार पडल्याचा दावा केला.