‘आयएमईआय’ क्रमांक बदलणा-या टोळीचे मुंबई ‘कनेक्शन’ उघड

By admin | Published: October 13, 2015 10:56 PM2015-10-13T22:56:30+5:302015-10-13T22:56:30+5:30

पाचही आरोपींना घेऊन एटीसी मुंबईला रवाना, पोलीस कोठडीत वाढ.

Mumbai 'connection' to replace 'IMEI' number change | ‘आयएमईआय’ क्रमांक बदलणा-या टोळीचे मुंबई ‘कनेक्शन’ उघड

‘आयएमईआय’ क्रमांक बदलणा-या टोळीचे मुंबई ‘कनेक्शन’ उघड

Next

अकोला : आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीचे मुंबई कनेक्शन उघड झाले असून, या आरोपींना घेऊन एटीसी मंगळवारी मुंबईला रवाना झाली. या आरोपींनी मुंबईतून चोरीचे मोबाइल खरेदी करून त्याचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री केल्याचे समोर आले आले होते. आयएमईआय क्रमांक बदलण्यार्‍या आरोपींचे मुंबईपर्यंत कनेक्शन असल्याचे 'लोकमत'ने प्रकाशित केले होते.
बनावट दस्तऐवजाद्वारे सिमकार्डची खरेदी करून मोबाइल हॅण्डसेटचा आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीतील आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करीत त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बोगस सिमकार्डधारकांची पडताळणी सुरू असतानाच बोगस सिमकार्डधारक मोहम्मद आरिफ मोहम्मद युनूस याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. अ. मुजाहिद अ. माजिद याचे शहरातील काही मोबाइल दुकानदारांशी साटेलोटे असून, या दुकानांवरूनच सदर चोरीच्या मोबाइलची विक्री करण्याचा गोरखधंदा या टोळीने सुरू केला होता. यामध्ये मोहम्मद आरिफ मोहम्मद युनूस, अ. मुजाहिद अ. माजिद, तेजस्वी मोबाइलचा संचालक प्रवीण प्रल्हाद गुप्ता, इर्शादउल्ला खान अमजदउल्ला खान व सैयद इरफान सैयद उस्मान या पाच जणांचा समावेश आहे. या टोळीने मुंबईतून चोरीचे मोबाईल खरेदी करणे व ते अकोल्यातील काही दुकानावरून विक्री करणे, हा या टोळीचा मोठा व्यवसाय असल्याचेही समोर आल्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे.

आरोपीला कोसळले रडू
या पाचही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी दुपारी ४ वाजता न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयात एका आरोपीचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. कुटुंबीयांना पाहताच या आरोपीला रडू कोसळले.

खासगी मोबाईल जप्त
आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीतील पाचही आरोपींचे खासगी मोबाईल दहशतवाद विरोधी सेलने मंगळवारी जप्त केले. त्यांच्या खासगी मोबाईलचा डाटा काढण्याचे कामही एटीसीने सुरु केले आहे. या आरोपींना मुंबईला घेउन ज्याण्यापूर्वी त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai 'connection' to replace 'IMEI' number change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.