महाबळेश्वरएवढीच मुंबई थंड

By Admin | Published: December 27, 2016 01:19 AM2016-12-27T01:19:23+5:302016-12-27T01:19:23+5:30

कायम घामांच्या धारांनी त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सोमवारी महाबळेश्वरच्या वातावरणाचा फिल आला. निमित्त होते ते घसरलेल्या किमान तापमानाचे. महाबळेश्वर आणि मुंबईचे

Mumbai cooler than Mahabaleshwar | महाबळेश्वरएवढीच मुंबई थंड

महाबळेश्वरएवढीच मुंबई थंड

googlenewsNext

मुंबई : कायम घामांच्या धारांनी त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सोमवारी महाबळेश्वरच्या वातावरणाचा फिल आला. निमित्त होते ते घसरलेल्या किमान तापमानाचे. महाबळेश्वर आणि मुंबईचे किमान तापमान सोमवारी समान नोंदवण्यात आले. महाबळेश्वरचे किमान तापमान १५ तर मुंबईचे किमान तापमान १५.९ अंश नोंदवण्यात आले असून, घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकर चांगलेच गारठले आहेत. तर मंगळवारसह बुधवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंशावर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी मुंबईत पडलेली थंडी आणखी काही दिवस कायम राहणार असून, येथे पडलेल्या गारव्याने मुंबई चांगलीच सुखावली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीसह उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तर भारतातील शीत वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. परिणामी मुंबईसह राज्यातील किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ९.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदवण्यात आले होते. सोमवारी किमान तापमानात एक अंशाची घसरण झाली असून, शहरात पडलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे मुंबई गारठली आहे. दरम्यान, गोव्यासह संपुर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मुंबई शहराऐवजी पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग अधिक आहे. या कारणात्सव शहराच्या तुलनेत उपनगरातील वातावरण अधिक थंड असून, किमान तापमान खाली घसरल्याने ऊकाड्याने हैराण असणारे मुंबईकर सध्या तरी थंडीमुळे सुखावले आहे. (प्रतिनिधी)

राज्यातील शहरांचे किमान तापमान
नाशिक-९.६
जळगाव-९.७
पुणे-१०.९
औरंगाबाद-१०
गोंदिया-१०
मालेगाव-११
अकोला-११.५
नागपूर-११.७
सोलापूर-१२.७
परभणी-१२
अमरावती-१२.८
चंद्रपूर-१२.६
यवतमाळ-१२.४
सातारा-१३
नांदेड-१३
वर्धा-१३
कोल्हापूर-१४.८
महाबळेश्वर-१५
बीड-१५

(अंश सेल्सिअसमध्ये)

Web Title: Mumbai cooler than Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.