धक्कादायक! ५ हजारांपैकी केवळ २०० मुंबईचे डबेवाले कार्यरत; कोरोनातील भीषण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:14 PM2021-04-15T18:14:05+5:302021-04-15T18:16:42+5:30

mumbai dabbawala: ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

mumbai dabbawala facing tough time due to new corona lockdown restrictions in the state | धक्कादायक! ५ हजारांपैकी केवळ २०० मुंबईचे डबेवाले कार्यरत; कोरोनातील भीषण वास्तव

धक्कादायक! ५ हजारांपैकी केवळ २०० मुंबईचे डबेवाले कार्यरत; कोरोनातील भीषण वास्तव

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईचे २०० डबेवाले कार्यरतडबेवाल्यांना काही आर्थिक मदत करण्याची सरकारला विनंतीनव्या निर्बंधांमुळे डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

मुंबई: भारतासह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे उद्योगांची अवस्था बिकट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक क्षेत्रातील लघु, मध्यम तसेच मोठे उद्योग तोट्यात गेले आहेत. हजारो कंपन्यांना टाळे लागले आहे. कोरोनाचा कहर मुंबईच्या डबेवाल्यांवरही कोसळला आहे. मॅनेजमेंट गुरू म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ आली असून, तब्बल ५ हजार डबेवाल्यांपैकी केवळ २०० डबेवाले शिल्लक राहिले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (mumbai dabbawala facing tough time due to new corona lockdown restrictions in the state)

गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आली असून, अनेकांनी आपलाय व्यवसाय सोडून आता हमाली आणि सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा डबेवाल्यांना होती. मात्र, पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. 

मुंबईचे २०० डबेवाले कार्यरत

मुंबईतील एकूण ५ हजार डबेवाल्यांपैकी फक्त ४०० ते ५०० डबेवाले काम करत होते. मात्र, आता नव्याने लॉकडाऊन लावल्यामुळे त्यातील २०० ते २५० डबेवाल्यांनी व्यवसाय बंद केला. आम्ही सरकारला विनंती करतो की, डबेवाल्यांना काही आर्थिक मदत करा, असे विष्णू काळडोके यांनी म्हटले आहे. दोन वेळची भूक भागवण्यासाठी डबेवाल्यांना आपला व्यवसाय सोडून हाती पडेल ते काम करण्याची वेळ आली आहे. तर काही जणांनी हाती काम नसल्यामुळे गाव गाठले आहे.

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

डबेवाले, सलून चालकांना मदत द्या

महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासे विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटकही प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  

“संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
 

Web Title: mumbai dabbawala facing tough time due to new corona lockdown restrictions in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.