मुंबई : कर्तव्यावर असताना हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:07 AM2017-12-23T04:07:45+5:302017-12-23T04:08:04+5:30
नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. डोंबिवली परिसरात ते पत्नीसोबत राहायचे. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. दुपारी काम करीत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले.
मुंबई : कर्तव्यावर असताना पोलीस ठाण्यातच ३१ वर्षीय पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पायधुनीत घडली. गजेंद्र पाटील असे मृत शिपायाचे नाव आहे. पाटील गेल्या पाच वर्षांपासून पायधुनी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते २००८च्या बॅचचे होते. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. डोंबिवली परिसरात ते पत्नीसोबत राहायचे. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. दुपारी काम करीत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना सहकाºयांनी रुग्णालयात नेले. तेथे ईसीजी काढून ते बाहेर आले आणि बाकड्यावर बसत असतानाच खाली कोसळले. तेथेच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कर्तव्यदक्ष, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्याच जवळचे होते. त्यामुळे पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.