मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकानं 20 ते 25 जणांना उडवले

By admin | Published: July 18, 2016 01:00 AM2016-07-18T01:00:24+5:302016-07-18T07:24:48+5:30

मालाड बांगुरनगरमधल्या इन्फिनिटी मॉलबाहेर मद्यपी कारचालकाने २० ते २५ पादचा-यांना उडवल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

In Mumbai, the drug addicts drunk 20 to 25 people | मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकानं 20 ते 25 जणांना उडवले

मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकानं 20 ते 25 जणांना उडवले

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मालाड बांगुरनगरमधल्या इन्फिनिटी मॉलबाहेर मद्यपी कारचालकाने २० ते २५ पादचा-यांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, गाडीचालकाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळते आहे. पोलिसांकडून मदतकार्य मिळत नसल्याने स्थानिक नागरिकही संतप्त झाले होते.

मद्यपी गाडीचालक पत्नीसोबत इन्फिनिटी मॉलच्या दिशेने दारूच्या नशेत येते असताना गाडीचालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी थेट मॉल परिसरात घुसली. रविवारच्या सुट्टीनिमित्त मॉल परिसरात जमलेल्या नागरिकांना दारूच्या नशेत झिंगलेल्या या कारचालकानं किड्या-मुंग्याप्रमाणे तुडवत सुसाट गाडी नेली. गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आमीर खान याने दिली आहे.

पोलिसांकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात अडचण येत होत्या. परिसरात गोंधळ, मदतीऐवजी लाठीमार होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. स्थानिकांच्या मदतीनं जखमींपैकी 12 पेक्षा जास्त जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती बांगुरनगर पोलिसांनी दिली. 

Web Title: In Mumbai, the drug addicts drunk 20 to 25 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.