Mumbai Drug Case: दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, शरद पवारांनाही पुरावे देणार, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 11:06 AM2021-11-01T11:06:59+5:302021-11-01T13:47:57+5:30

Devendra Fandavis News: Nawab Malik यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे Sharad Pawar यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

Mumbai Drug Case: Nawab Malik's links with the underworld will be revealed, evidence will also be given to Sharad Pawar, Devendra Fandavis warns | Mumbai Drug Case: दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, शरद पवारांनाही पुरावे देणार, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा 

Mumbai Drug Case: दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, शरद पवारांनाही पुरावे देणार, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा 

googlenewsNext

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांचे ड्र्ग्स माफियांशी संबंध आहे. त्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरू आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे. आता शेवट मी करणार. त्यांनी लवंगी लावली, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिक यांनी लंवगी फटाकडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याबाबत बोलू नये आणि, आणि ड्रग्सबाबतही बोलू नये. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, याचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे गौप्यस्फोट करत असलेल्या नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी हा आरोप केला.

Web Title: Mumbai Drug Case: Nawab Malik's links with the underworld will be revealed, evidence will also be given to Sharad Pawar, Devendra Fandavis warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.