Mumbai Drug Case: ड्रग्सच्या व्यवसायात तुमची मेहुणी हर्षदा रेडकरही सहभागी आहे का? नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 10:06 AM2021-11-08T10:06:00+5:302021-11-08T10:06:38+5:30

Mumbai Drug Case: आता नवाब मलिक यांनी Sameer Wankhede यांची मेहुणी आणि अभिनेत्री Kranti Redkar हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी Harshda Deenanath Redkar ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल Nawab Malik यांनी विचारला आहे. 

Mumbai Drug Case: Is your sister in law Harshda Redkar also involved in drugs business? Nawab Malik's question to Sameer Wankhede | Mumbai Drug Case: ड्रग्सच्या व्यवसायात तुमची मेहुणी हर्षदा रेडकरही सहभागी आहे का? नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

Mumbai Drug Case: ड्रग्सच्या व्यवसायात तुमची मेहुणी हर्षदा रेडकरही सहभागी आहे का? नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

googlenewsNext

मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणावरून समीर वानखेडेंविरोधात आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका कायम ठेवली आहे. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

यासंदर्भात नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे.

आपल्या आरोपांना पुरावा म्हणून नवाब मलिक यांनी काही कागदपत्रे शेअर केली आहेत. त्यामधून हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्यावर पुण्यातील कोर्टात खटला सुरू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आता नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या वादाला नवे वळण लागण्याची शक्यता आहेत.

दरम्यान, अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई ड्रग्स प्रकरणात अडकवण्यात आले. त्याचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. तसेच या सर्वाचे मास्टरमाईंड भाजपा नेते मोहित कंबोज असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता.  खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर २५ कोटींची मागणी करण्यात आली. तसेच अखेर १८ कोटींवर तडजोड झाली. त्यातील ५० लाख घेण्यातही आले. मात्र एका सेल्फीमुळे ही डिल फसली, असा दावा मलिक यांनी केला. तसेच या प्रकरणामध्ये भाजपा नेते मोहित कंबोज हे मास्टर माईंड असून, ते समीर वानखेडे यांचे चांगेल मित्र असल्याचा दावाही नबाव मलिक यांनी केला. 

Web Title: Mumbai Drug Case: Is your sister in law Harshda Redkar also involved in drugs business? Nawab Malik's question to Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.