मुंबई-गोवा महामार्गाने हैराण केले! चंद्रकांत पाटील यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:36 PM2018-03-23T23:36:56+5:302018-03-23T23:36:56+5:30
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे वाहनचालकच नव्हे, तर दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील हेदेखील हैराण झाले असून, तशी कबुुली त्यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रात हैराण करणारे खूप कमी प्रकल्प आहेत. त्यापैकी मुंबई-गोवा महामार्गाने सर्वाधिक हैराण केले आहे, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.
मुंबई : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे वाहनचालकच नव्हे, तर दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील हेदेखील हैराण झाले असून, तशी कबुुली त्यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रात हैराण करणारे खूप कमी प्रकल्प आहेत. त्यापैकी मुंबई-गोवा महामार्गाने सर्वाधिक हैराण केले आहे, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.
या महामार्गावरील भूसंपादनाबाबतचे अनेक दावे रखडले आहेत. वेळेत या दाव्यांचा निपटारा होत नसल्याचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुनील तटकरे यांनी मांडला, तर इंदापूरच्या पुढे २८ जणांनी जमिनीच दिली नसल्याने, या वर्षीही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार नसल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झारप या दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या भागातील पुलांचे काम पूर्ण झाले आहे.
मात्र, पनवेल-इंदापूरचा पहिला टप्पा मात्र रखडल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या टप्प्यातील दावे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर सुनावण्या घेण्यात येतील, तसेच सोमवारी जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.