मुंबई-गोवा महामार्ग खचला

By admin | Published: June 9, 2016 02:28 AM2016-06-09T02:28:37+5:302016-06-09T02:28:37+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

The Mumbai-Goa highway wasted | मुंबई-गोवा महामार्ग खचला

मुंबई-गोवा महामार्ग खचला

Next

सिकंदर अनवारे,

दासगाव- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाड तालुक्यातील दासगांवच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस वसलेल्या नागरिकांच्या रहदारीसाठी महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहे. काही वर्षांपूर्वी दासगांव खिंडीचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलाचे रुंदीकरण करून बाजूच्या रस्त्यालाही १० फू ट वाढवण्यात आले. मात्र त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणचे निकृष्ट दर्जाचे काम झाले होते. त्यामुळे पुलाचा काही भाग पावसाळ्यात खचला होता. त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी लावण्यात आली होती. सध्या वाढलेल्या वाहतुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा याच ठिकाणी जवळपास दीड फूट राष्ट्रीय महामार्ग खचला आहे.
खचलेल्या ठिकाणाहून फक्त १० किमी अंतरावर महामार्गाचे कार्यालय असून महामार्ग प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे.
जानेवारी महिन्यापासून या मार्गावर वाहतूक वाढली आहे. दासगांव खिंड ते बसस्टॉप जवळपास २०० मीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्गाचा अर्धा भाग एका बाजूने खचत आहे. मुंबई ते गोवा दिशेने जाणारी वाहने वेगाने आल्यानंतर
मुंबई दिशेला समोरून येणारी वाहने पाहिल्यानंतर या खचलेल्या भागामुळे तिरकी होवून चालकाचे नियंत्रण सुटत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे.
>पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरण
दासगांव हद्दीतील या पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते. जवळपास ६ ते ७ फूट पूल तसेच या ठिकाणच्या रस्त्याचे देखील रुंदीकरण के लेहोते.
सुरुवातीलाच्या पावसात या पुलाच्या शेजारी रुंदीकरण करण्यात आलेला रस्ता व पूल काही प्रमाणात खचला व या ठिकाणी जुना आणि नवीन पुलाचा जोड बरोबर न झाल्याने दोन्ही पुलाच्या मधल्या भागातून उन्हामुळे डांबर विरघळून गळती झाली होती.
यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना फटका बसून या डांबरामुळे भाजले होते, तर कित्येक नागरिकांचे कपडे खराब झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
>ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथे जावून पाहणी करतो. आमच्या लेव्हलचे छोटे काम असेल तर लगेच करून घेतले जाईल. मोठे काम असेल तर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे ताबडतोब पाठवून देण्यात येईल, त्यानंतर आदेशाप्रमाणे काम के ले जाईल.
-प्रकाश गायकवाड, उपअभियंता,
राष्ट्रीय महामार्ग महाड विभाग.

Web Title: The Mumbai-Goa highway wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.