मुंबई: 7 विभागातील मतदानाची आकडेवारी जाहीर, बोरिवलीत सर्वाधिक मतदान

By admin | Published: February 21, 2017 12:09 PM2017-02-21T12:09:51+5:302017-02-21T12:55:41+5:30

मुंबईतील सात विभागातील मतदानाचा आकडा जाहीर झाला असून आत्तापर्यंत बोरिवलीत सर्वाधिक म्हणजे ९.९१% मतदान झाले.

Mumbai: Highest voter turnout in Borivli, declares voting figures in 7 divisions | मुंबई: 7 विभागातील मतदानाची आकडेवारी जाहीर, बोरिवलीत सर्वाधिक मतदान

मुंबई: 7 विभागातील मतदानाची आकडेवारी जाहीर, बोरिवलीत सर्वाधिक मतदान

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - अतिशय प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या अशा मुंबई महापालिकेसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. दरम्यान मुंबईतील सात विभागातील मतदानाचा आकडा जाहीर झाला आहे. आत्तापर्यंत बोरिवलीत सर्वाधिक म्हणजे९.९१% मतदान झाले असून मालाडमध्ये ८.५५ %,  गोरेगांवमध्ये ८.६८ %, भांडूप ७.८८ %, घाटकोपर ४.६० % वरळी ८.०२ % आणि वांद्रे (पू) येथे ८.४३ % मतदान झाले आहे. 
शिवसेना आणि भाजप यांच्यातीलल्या कलगीतुऱ्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली असून शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्त्वाची लढाई ठरताना दिसत आहे. 
 मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी दोन हजार २७५ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील तब्बल ९५ लाख मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
दरम्यान आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदानाचा अधिकार बजावला. 
 
 
 
 

Web Title: Mumbai: Highest voter turnout in Borivli, declares voting figures in 7 divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.