मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:52 AM2019-11-23T02:52:30+5:302019-11-23T02:52:45+5:30

खराब हवामान, रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा नाही; विमाने वळवितात अहमदाबादला

Mumbai-Jalgaon Airlines canceled continuously | मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द

मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द

Next

मुंबई : मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द होत आहे. या विमानसेवेला खराब हवामानाचा फटका बसतो आहे, शिवाय रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा जळगाव विमानतळावर उपलब्ध नसल्याने, ही समस्या वारंवार उद्भवत आहे. ‘उडाण’ योजनेमध्ये या विमानतळाचा समावेश केल्यानंतरही प्रवाशांना विमानसेवा मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबईहून जळगावला जाण्यासाठी ट्रुजेटचे विमान चालविले जाते. उडाण योजनेत १ सप्टेंबरपासून विमानसेवा चालविली जात आहे.
सकाळी अहमदाबाद येथून हे विमान जळगावला येते. तिथून मुंबईला येते. त्यानंतर, कोल्हापूर व नंतर परतीचा प्रवास केला जातो. मात्र, यामध्ये कंपनीने इंदूरचा समावेश केला आहे. त्यामुळे जळगावात सकाळी साडेदहा वाजता हे विमान येणे अपेक्षित असताना त्याला विलंब होतोे. परिणामी, या विमानाच्या पुढील सर्व उड्डाणांवर परिणाम होतो. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून येणारे विमान जळगावात उतरणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा त्याला विविध कारणांमुळे विलंब होतो.

जळगाव विमानतळावर रात्री लँडिंग करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत विमान प्रवास शक्य आहे. सूर्यास्तानंतर विमान जळगावात आल्यास हवाई नियंत्रण कक्षातून विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे हे विमान अहमदाबादकडे वळवले जाते.

प्रवाशांचा संताप
गेल्या आठवड्यात मुंबईहून आलेले विमान जळगावात न उतरता थेट अहमदाबादला जाण्याचे प्रसंग दोन-तीन वेळा घडले, तर जळगावातून अहमदाबादला जाण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांनादेखील जळगाव विमानतळावर ताटकळत राहावे लागले. मुंबईहून जळगावला जाण्याऐवजी प्रवाशांना अहमदाबादला जावे लागले. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mumbai-Jalgaon Airlines canceled continuously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.