मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:43 AM2017-12-23T03:43:08+5:302017-12-23T03:43:34+5:30

जळगाव ते मुंबई या प्रवासी विमानसेवेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एअर डेक्कन कंपनी व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली.

 Mumbai-Jalgaon flight inaugurated today by Dream Minister, Guardian Minister Chandrakant Patil | मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

googlenewsNext

जळगाव : जळगाव ते मुंबई या प्रवासी विमानसेवेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एअर डेक्कन कंपनी व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली.
विमानतळाच्या शुभारंभानिमित्त बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी पहाटे जळगाव येथे अजिंठा शासकीय विश्रागृहावर येणार आहेत. तेथे नागरिकांच्या भेटी घेतील. त्यानंतर ते दुपारी १ वाजता विमानतळावर विमानसेवेचा शुभारंभ करतील. मुंबईहून येणा-या प्रवाशांचे स्वागत व जळगावहून मुंबईला जाणा-या प्रवाशांना शुभेच्छा ते देणार आहेत. त्यानंतर ते स्वत:ही विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. विमान प्रवासाचे दर १ हजार ४२० रुपयांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. एअर डेक्कन विमान कंपनीच्या वेबसाईटवर यापूर्वी तिकीट विक्री सुरू झाली आहे.

Web Title:  Mumbai-Jalgaon flight inaugurated today by Dream Minister, Guardian Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.