ठाकरे सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या विचारात?; मुंबईच्या महापौरांनी दिले महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:03 PM2021-02-16T15:03:10+5:302021-02-16T15:08:33+5:30

mumbai mayor hints lockdown in maharashtra: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

mumbai mayor hints about lockdown in state after corona cases increases | ठाकरे सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या विचारात?; मुंबईच्या महापौरांनी दिले महत्त्वाचे संकेत

ठाकरे सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या विचारात?; मुंबईच्या महापौरांनी दिले महत्त्वाचे संकेत

Next

मुंबई: मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं पेडणेकर म्हणाल्या. (mumbai mayor kishori pednekar hints about lockdown)

Exclusive: पुणेकरांना सर्वात आधी द्या कोरोना लस; मोदी सरकार घेणार का 'त्या' पत्राची दखल?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर अतिशय सूचक भाष्य केलं. 'गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांचं प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहिल्यास महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील,' असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणदेखील दिसू लागल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.




कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. तेव्हापासून कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. लोक स्वत:ची काळजी घेत नसतील तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. तशी चिंता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. प्रत्येकानं स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना जपायला हवं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकू, असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनचे संकेत दिले.

मुंबईतील लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार? गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

थोड्याच वेळात मुख्यमंत्री घेणार राज्यातील स्थितीचा आढावा
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. 
 

Web Title: mumbai mayor hints about lockdown in state after corona cases increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.