"एकवेळ आदित्य ठाकरेंचं नाव ठीक, पण रश्मी वहिनींचं नाव का घेता?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:01 PM2021-12-22T15:01:02+5:302021-12-22T15:06:14+5:30

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा संताप

mumbai mayor kishori pednekar targets bjp chadrakant patil rashmi thackeray cm charge statement | "एकवेळ आदित्य ठाकरेंचं नाव ठीक, पण रश्मी वहिनींचं नाव का घेता?"

"एकवेळ आदित्य ठाकरेंचं नाव ठीक, पण रश्मी वहिनींचं नाव का घेता?"

Next

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. कोरोनाच्या आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा मुलावरही बहुतेक विश्वास नसावा, अशी फिरकी चंद्रकांत पाटील यांनी घेतली. तसचं रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते, असंही ते म्हणाले. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

"रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात. अमृता फडणीवस लाईमलाईटमध्ये असतात त्यांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का हे आधी सांगा. एकवेळ आदित्य ठाकरे हे मंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव घेणं किंवा अन्य कोणाचं हे ठीक आहे. पण रश्मी ठाकरेंचं नाव का घेता. त्या कधीच यात नसतात. महाराष्ट्राचं राजकारण अजून किती खाली आणणार. महिलांचं हनन करणं ही हिंदू संस्कृती नाही," असं पेडणेकर म्हणाल्या.

काय म्हणाले होते पाटील? 
"मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असणं स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतला तर ते सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे," असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: mumbai mayor kishori pednekar targets bjp chadrakant patil rashmi thackeray cm charge statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.