मुंबई मेट्रोचा प्रवास महागला, १ डिसेंबरपासून ५ रुपयांची भाव वाढ

By admin | Published: November 27, 2015 07:33 PM2015-11-27T19:33:30+5:302015-11-27T20:07:47+5:30

मुंबईतील मेट्रो प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. मेट्रोच्या तिकीटात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

Mumbai Metro travel expanses, price rise of 5 rupees since 1 st December | मुंबई मेट्रोचा प्रवास महागला, १ डिसेंबरपासून ५ रुपयांची भाव वाढ

मुंबई मेट्रोचा प्रवास महागला, १ डिसेंबरपासून ५ रुपयांची भाव वाढ

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मुंबईतील मेट्रो प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. मेट्रोच्या तिकीटात आणि मासिक पासात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. 
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मुंबई मेट्रोची प्रस्तावित १ नोव्हेंबरपासून लागू होणार होती. मात्र मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MOPL) या कंपनीने एक बैठक घेऊन मेट्रोचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
आता ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ४५ रुपये मोजावे लागणार आहे. तर घाटकोपर ते अंधेरी प्रवासासाठी ३५ रुपये मोजावे लागणार आहेत.
दोन टप्प्यात असलेला मासिक पास ६७५ रुपयांवरुन ७२५ रुपये होणार आहे, तर ९०० रुपयांचा पास ९५० रुपये होणार आहे. मेट्रोचे सध्याचे दर १०, २०, ३०, ४० असे दर आहेत. आता त्यामध्ये प्रत्येकी पाच रुपयांची वाढ होऊन १०, २०, २५, ३५ आणि ४५ रुपये होणार आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ही दरवाढ १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. 
 

Web Title: Mumbai Metro travel expanses, price rise of 5 rupees since 1 st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.