वाहन नोंदणीवर मर्यादा आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

By admin | Published: February 18, 2016 06:13 PM2016-02-18T18:13:32+5:302016-02-18T18:23:13+5:30

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून मुंबईकरांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे

Mumbai Municipal Corporation proposes to limit vehicle registration | वाहन नोंदणीवर मर्यादा आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

वाहन नोंदणीवर मर्यादा आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

Next
>ऑनलाइन लोकमत 
 
मुंबई, दि. 18 - मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून मुंबईकरांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे. 
द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रस्तावात 3 पर्याय सुचवण्यात आले आहेत. ज्यामध्ये नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची ठराविक तारखेनंतर नोंदणी केली जाऊ नये; नव्या वाहन नोंदणींवर मर्यादा तसंच पार्कीग करण्यासाठी जागा असल्याचा पुरावा दिला तरच वाहन नोंदणी करुन देणे हे पर्याय सुचवण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल आणि याचा परिणाम वाहतुकीची समस्या मिटेलच सोबत पार्कींगलादेखील जागा मिळेल असं या प्रस्तावात सांगितले गेले आहे.
 या प्रस्तावात काही उपायदेखील सुचवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूकीच्या पायाभूत सुविधा सुधारण्याची गरज असल्याच सांगितल आहे जेणेकरुन लोकांना आणि वाहनांना अडथळा येणार नाही. 34 बस मार्ग बांधण्यात यावेत ज्यावर फक्त बसेसना वाहतुकीची परवानगी असेल, ज्यामुळे त्यांचा वेग आणि फे-या वाढण्यास मदत होईल. यासोबतच मेट्रो नेटवर्क, 19 प्लायओव्हर, 100 सायकलिंग ट्रॅक आणि 6 एलिवेटेड रस्ते बांधण्याचंदेखील सुचवण्यात आले आहे. 
राज्य सरकारचे अधिकारी यावर काही बोलत नसले तरी लवकरच हा प्रस्ताव अंमलात आणला जाण्याची चर्चा आहे. काही अधिका-यांनी खाजगी वाहनांवर सरसकट बंदी घातली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. 

Web Title: Mumbai Municipal Corporation proposes to limit vehicle registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.