मुंबई महापालिका शिवसेनाच राखणार - उद्धव ठाकरे
By admin | Published: December 27, 2016 05:48 PM2016-12-27T17:48:33+5:302016-12-27T17:48:33+5:30
मुंबई महापालिका शिवसेनाच राखणार असल्याचं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 27 - मुंबई महापालिका शिवसेनाच राखणार असल्याचं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. धुळ्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना कोणत्याही परिस्थितीत मुंबई आपण राखणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जास्तीत जास्त महापालिका जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे. तसेच जास्तीत जास्त महापौर शिवसेनेचे झाले पाहिजेत. आता परिस्थिती बिकट आहे', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
नोटाबंदी म्हणजे मृगजळ -
यावेळी उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत नोटाबंदी म्हणजे मृगजळ असल्याचं बोलले आहेत. नोटाबंदीचा त्रास बोलून दाखवला की बेईमान, त्रास बोलून दाखवणं हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. मोदी म्हणाले होते 50 दिवस मला द्या नाहीतर चाबकानं फोडा. आता तीस तारखेला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत मग काय करायचं थर्टी फर्स्ट?’ असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धुळे आणि नंदुरबारच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.